माळशेज,प्रतिनिधी
दीपक मंडलिक
ओतूर – श्री गाडगे महाराज प्राथमिक आश्रम शाळा ओतूर येथे शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत असणारे रणजित पवार यांनी लिहिलेल्या ‘देशातील पहिली महिला कुस्तीपटू – ममता पहिलवान’ या पुस्तकाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स ने घेतली आहे.
ममता पहिलवान सर्व कपडे काढून फक्त लंगोटवर पुरुषांच्या बरोबरीने कुस्त्या खेळणारी त्या काळातील एकमेव पहिली महिला होय. त्यांचा जन्म पाटोळे ता. सिन्नर जि नाशिक येथे सुमारे 125 वर्षांपूर्वी झाला. या महिलेचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या काळात महिलांना कुठल्याही प्रकारची घराबाहेर पडण्याची संधी नसताना त्या एक कुस्तीपटू झाल्या. वयाच्या 14 व्या वर्षी येणाऱ्या मासिक पाळीला ‘भक्ती आणि तपश्चर्येने ‘बंद करणे,कुस्ती या खेळात अडथडा होऊ पाहणाऱ्या छातीच्या वाढत्या अवयवावर विटा-दगडांनी मारा करणे,जोर बैठक काढताना 200 ग्रॅमचा खड्डा पूर्ण घामाने भरेपर्यंत बंद न करणे,वाघाशी झुंज ,ममत्या पहिलवान या नावाने सगळीकडे परिचित,इत्यादी अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटनांनी साकारलेले महिला कुस्तीपटूच्या जीवनावरील देशातील पहिलेच पुस्तक चरित्राच्या माध्यमातून लवकरच प्रकाशित होत आहे.
देशातील पहिली महिला कुस्तीपटू ममता पहिलवान या आगळ्या वेगळ्या पुस्तकाची राष्ट्रीय विक्रम म्हणून नोंद झाल्यामुळे श्री गाडगे महाराज संस्था ओतूर चे संचालक,मुख्याध्यापक वर्ग शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी,तसेच महाराष्ट्रातील साहित्यिक, मित्र परिवाराकडून रणजित पवार यांचे कौतुक होत आहे
या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन होणार असून प्रदीप सूर्यवंशी यांनी या पुस्तकाचे सुंदर आकर्षक मुखपृष्ठ तयार केले आहे.
रणजित पवार कवी,लेखक,समीक्षक,संपादक, संयोजक म्हणून परिचित आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून सहभाग घेतला आहे. श्री गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य या व्हाट्सअप् समूहाद्वारे दोन राज्यस्तरीय काव्यमहोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन
आतापर्यंत प्रकाशित पुस्तकेदीपस्तंभ(ललित लेखसंग्रह) , गाडग्यातली अमृतवाणी आणि क्रांतीज्योतीला वंदू या (प्रातिनिधिक कविता संग्रह)
आगामी : मुरलीधर बाबा शिंगोटे (पुण्यनगरी मालक ,संपादक) यांचं जीवनचरित्र आणि राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)