राज्यातील कायदा सुव्यवस्था गमावलेले महाराष्ट्र सरकार बरखास्त करावे, सकल ओबीसी समाजाचे मा.राष्ट्रपतींना निवेदन

ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन मा.तहसिलदार, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयासमोर अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.    यावेळी मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देऊ नये अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणणारे सरकार मराठ्यांना सर्रास कुणबीचे दाखले देऊन ओबीसींना पुन्हा गांवकुसाबाहेर काढण्याचे काम  करीत आहे, अशी खंत सुरेश गायकवाड यांनी व्यक्त केली.      आंदोलनकर्त्यांना बारा बलुतेदार महासंघाचे प्रांत ऊपाध्यक्ष, गुरव समाजाचे जेष्ठ नेते प्रताप गुरव, परीट समाजाचे विशाल जाधव, बंशी पार्डे, साळी समाजाचे शहराध्यक्ष विष्णु निसळ, महेश भागवत, सुतार समाजाचे नेते विवेकानंद सुतार, नारायण भागवत, धनगर समाजाचे शहरातील नेते भारत मनोहर, अजित चौगुले, राहुल मदने, वडार समाजाचे शहराध्यक्ष प्रदिप पवार, तेली समाजाचे शहराध्यक्ष अनिल राऊत, रविंद्र भडाळे, वंजारी समाजाचे नेते प्रा. गणेश ढाकणे, वैजनाथ शिरसाट, हनुमंत घुगे, माळी महासंघाचे राष्ट्रीय ऊपाध्यक्ष काळुराम आण्णा गायकवाड, नेते आनंदा कुदळे, विजय दर्शले, समता परिषदेचे शहराध्यक्ष अँड. चंद्रशेखर भुजबळ, महिलाध्यक्षा वंदना जाधव, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते इंजि. देवेंद्र तायडे, राजन नायर आदि मान्यवरांनी ऊपस्थितांना सद्यस्थिती बाबत मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते निखिल दळवी, लहु अनारसे सह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनात भाग घेतला.   पिंपरी-चिंचवड शहराचे मा. तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *