बातमी :- विभागीय संपादक, रवींद्र खुडे.
दि. 25/05/2021.
शिरूर :
पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ट्रॅक्टर, चार चाकी, दुचाकी, गाया चोरणारे तिघे अट्टल चोर, पुणे LCB च्या पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांनी केलेल्या चोऱ्या या धक्कादायक आहेत
पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर, राजगुरूनगर या तालुक्यांसह धुडगूस घालणाऱ्या, सराईत चोरट्यांच्या चार जणांच्या टोळीच्या पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक, पद्माकर घनवट यांच्या पथकाने शिरूर येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनि केलेले सुमारे अठ्ठावीस गुन्हे उघडीस आणून, दहा ट्रॅक्टरसह 77 लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती, पुणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर धनवट यांनी दिली आहे.
वरिष्ठ पो. निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शिरूर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, मंचर, जुन्नर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बेलवंडी येथे त्याचप्रमाणे, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इत्यादी तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे गेली काही महिन्यांपासून घडत होते. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत व त्रस्त झालेला होता. त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, यांनी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, यांना शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चीरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सक्त सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, उमाकांत कुंजीर, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, सचिन गायकवाड, दत्तात्रय तांबे, पो. ना. दिपक साबळे, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे, पो.कॉ. संदिप वारे, जितेंद्र मांडगे, अक्षय जावळे यांचे पथक तयार करून तपासकामी रवाना केले होते.
गोपनीय बातमीदारा मार्फत पुणे LCB पथकाला बातमी मिळाली की, शिरुर शहरात राहणारे सतीश अशोक राक्षे, ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे व प्रविण कैलास कोरडे, हे तिघेही एकत्रात फिरतात. ते कोणताही कामधंदा करीत नसून, त्यांचेकडे वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप अशा गाडया आणतात. त्या चोरीच्या असाव्यात अशी माहीती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने, पुणे विभागाच्या पथकाने सतीश अशोक राक्षे, (रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा.राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे), यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे साथिदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, (रा. रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे यांचे बिल्डींगमध्ये, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर), तसेच प्रविण कैलास कोरडे, (मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे) व सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचे सोबतीने, २८ ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची माहीती सांगितली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकुण ७६ लाख ८८ हजार किंमतीचे १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉपीओ, ६ मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने, असा मोठा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदर आरोपींना शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे पुढील अधिक तपास करीत आहेत.