घोडेगाव येथे RTPCR चाचणी सेंटर सुरु करण्याची मागणी…

दि. १२ घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

       घोडेगांव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने सुनिल इंदोरे  माजी उपसरपंच विद्यमान  ग्रामपंचायत सदस्य  घोडेगांव यांनी घोडेगाव या ठिकाणी RTPCR चाचणी सेंटर चालू करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.घोडेगाव ग्रामपंचायत तालुका पातळीवरील मोठी ग्रामपंचायत असून घोडेगाव पंचायत समिती आवारात कोरोना अँटिजेन चाचणी होत असते परंतु
गेले 15 दिवस झाले घोडेगाव परिसरात कोरोना अँटिजेन चाचणी बंद आहे.

आहुपे पट्ट्यातील व घोडेगाव, नारोडी, गिरवली, शिणोली येथून नागरिक चाचणी साठी येत असतात . RTPCR चाचणी करण्यासाठी भीमाशंकर आहुपे पट्टा व घोडेगाव, शिनोली,गिरवली नारोडी परिसरातील लोकांना अवसरी येथे जावे लागते.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते त्यामुळे घोडेगाव येथे RTPCR चाचणी करण्यात यावी.चाचणी साठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध असून अवसरी येथे RTPCR चाचणीसाठी  नागरिकांना हेलफाटे मारावे लागणार नाही व गैरसोय टळेल अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुनील इंदोरे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *