शिरूरच्या आदिशक्ती महिला मंडळाचा नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर शहरात यंदाचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने येथील रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या हस्ते या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आदिशक्तीने महिलांना चूल आणि मूल या साचेबद्ध जीवनातून बाहेर काढून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचे व आत्मविश्वास दृढ करण्याचे स्तुत्य काम केलेले आहे. तसेच महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोठे व्यासपीठ मिळवून दिलेले आहे.”
आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष असून महिलांच्या वाढत्या सहभागाने हा एक भव्य आनंदोत्सव बनत असल्याचे मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे यांनी सांगितले. फक्त महिलांसाठीच असणाऱ्या मोफत दांडिया खेळ व स्पर्धांचे भव्य, बंदिस्त व सुरक्षित अशा मंडपात आयोजन केले जाते. त्यासाठी शिरूर पोलीसांच्या वतीने महिला होमगार्ड चंदा चव्हाण व अंबिका लोखंडे यांचे विशेष सहाय्य लाभले.


चालू वर्षी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात अस्मिता ठोकळ यांनी मिसेस शिरूर, प्रियंका जाधव यांनी पैठणी, दांडिया स्पर्धेत मृणाल कर्डीले, पाककृती स्पर्धेत सविता सोनवणे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत गौरी चिंचोलकर, सामूहिक नृत्य स्पर्धेत पंचरत्न ग्रुप नसरीन शेख, तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत शिला लोंढे हे विजेते ठरले.
तर नवदुर्गा पुरस्कार हा माजी जि. प. सदस्या रेखा बांदल, पोलीस उपनिरीक्षक सुजाता पाटील, डॉ. सोनल भालेकर, साधना महासंघाच्या अध्यक्षा साधना शितोळे, उद्योजिका सविता बोरुडे, मीना गवारे, शिल्पा घोडे, कावेरी नाझीरकर, छबुबाई शेंडगे, यांना आकर्षक स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
राही प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व मीरा नर्सिंग होमच्या संचालिका डॉ. सुनीता पोटे यांनी महिलांसाठी असणारी सीए -१२५ ही कॅन्सरची तपासणी मोफत केली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पाटील यांचे यात सहकार्य लाभले. प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल, माजी जि. प. सदस्या रेखा बांदल, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, डॉ. सोनल भालेकर, डॉ. वर्षा पुजारी, माजी नगरसेवक विनोद भालेराव, उद्योजक महेंद्र फुलफगर, आनंद फुलफगर, किरण पठारे, विनय बोरा, वैभव खाबीया, आनंद स्टील सेंटर, अमोल माळवदकर नर्सरी, रासने बंधू, पुजा महाजन, योगिता दिघे, यांचे विशेष सहकार्य लाभले.
माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, अलका सरोदे, शहर पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कुणाल काळे, डॉ. स्मिता बोरा, डॉक्टर हार्दे, शाहीन पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेली दहा वर्षांपासून आदिशक्तीच्या संस्थापिका शशिकला काळे, अध्यक्षा सुनंदा लंघे, उपाध्यक्षा मनीषा कालेवार, सचिव लता नाझिरकर, उषा वाखारे, खजिनदार सुवर्णा सोनवणे, सहखजिनदार कोमल वाखारे, कार्याध्यक्षा निता सतिजा तसेच सर्व सदस्यांनी उत्सव पार पाडण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले.
नवरात्रोत्सव काळात दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांना आरतीचा मान देण्यात आला. पत्रकार बांधवांमध्ये सकाळचे ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर व सौ बारवकर, आपला आवाज केबल टिव्ही चॅनलचे विभागीय संपादक रवींद्र खुडे व सौ भारती खुडे, शिरूर हवेली साप्ताहिकाचे संपादक विजय पवार, जितेंद्रकुमार थिटे उपस्थित होते.
नऊ दिवसात जे विविध कार्यक्रम पार पडले त्यात सुनंदा लंघे यांच्या बहारदार सूत्रसंचालनाने एकच रंगत आणल्याची माहिती शशिकला काळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *