सबनीस विद्यामंदिराचे शासकीय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश, नऊ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी निवड

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
क्रीडा व युवा सेवा संचलनालय,पुणे,
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,पुणे आयोजित शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेत नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळविले. बालेवाडी स्टेडियम,पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यामंदिरातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विविध मैदानी क्रीडा प्रकारात यश मिळवले. त्यांची चंद्रपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशी माहिती मुख्याध्यापक अनुराधा पुराणिक आणि क्रीडाप्रमुख बबन गुळवे यांनी दिली.
विजयी खेळाडू पुढील प्रमाणे
१४ वर्षाखालील मुली
कस्तुरी चव्हाण
८० मी.अडथळाशर्यत- प्रथम
२०० मीटर धावणे – प्रथम
१७ वर्षाखालील मुले व मुली
निलवेद कोल्हे- लांब उडी प्रथम व तीहेरी उडी प्रथम,
चैतन्य कोल्हे, ५ की.मी. चालणे-प्रथम
कौस्तुभ बनकर-हातोड़ाफेक प्रथम
प्रियांजली सिंह-हातोड़ाफेक प्रथम
श्रुती दाते – हातोड़ाफेक द्वितीय,
१९ वर्षाखालील मुले-मूली
श्रेयश वाडकर-उंचउडी द्वितीय
शुभम सिंह – हातोड़ा फेक प्रथम
सानिका पादीर – हातोड़ाफेक प्रथम
सर्व विजयी खेळाडूंचा मुख्याध्यापक अनुराधा पुराणिक, उपमुख्याध्यापक सतीश तंवर,पर्यवेक्षक विलास शिंदे, सुषमा वाळींबे, रतिलाल बाबेल, क्रीडाप्रमुख बबन गुळवे व क्रीडाशिक्षकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर,उपाध्यक्ष आणि क्रीडा समिती प्रमुख सुजित खैरे, कार्यवाह रविंद्र पारगावकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक बबन गुळवे, राहूल नवले, कावजी भवारी, साहेबराव गाळव, बाबासाहेब वळकुंदे यांनी मार्गदर्शन केले.
या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडला जाणार असल्याचे उपमुख्याध्यापक सतीश तंवर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *