वर्ल्डकप २०२३ इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटींग ( सट्टा ) घेणारा पिंपरीतील मोठया बुकीला ४० लाख रुपयांसह गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात.

दि. २१/१०/२०२३ रोजी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने व पथक असे वाकड पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलींग फिरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने यांना मिळालेल्या बातमीचे पो.ना. १७२८ शाम बाबा यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन फलॅट नं. ७०१ आदी आम्मा ब्लीस सोसायटी, निरंकारी भवन जवळ, काळेवाडी, पुणे या ठिकाणी इसम नामे दिनेश हरीश शर्मा वय ३८ वर्षे रा. फलॅट नं. ७०१, आदी आम्मा ब्लीस सोसायटी, निरंकारी भवन जवळ, काळेवाडी, पुणे हा स्वतःचे फायदयाकरीता “क्रिकेट लाईव्ह लाईन गुरु” या सोशल मिडीया अॅपव्दारे सामना सुरु होण्यापुर्वी इंग्लंड जिंकले तर ०१ रुपयाला ६० पैसे, जर दक्षिण अफ्रिका जिंकली तर ०१ रुपयाला ६१ पैसे असा सुरुवातीचा भाव ठरलेला असतो, जशी जशी मॅच पुढे जाईल तसा सदरचा भाव खाली वर होत राहतो व त्याप्रमाणे त्या-त्या वेळेस सदर अॅपव्दारे दर ठरवला जातो व बुकींग घेतली जाते. त्यानुसार वर्ल्ड कप २०२३ मध्ये चालु असलेल्या इंग्लंड विरुध्द दक्षिण अफ्रिका या देशात वन डे क्रिकेट मॅचवर हाई-लगाई नावाचा क्रिकेट बेटींग हा जुगार इसम नामे धनू व शिवन यांचेकडे खेळत असताना ४०,००,००० रोख रुपये, ०२ मोबाईल व ०१ कल्क्युलेटर असा एकुण कि.रु. ४०,८०,१००/- रु. च्या साधनांसह मिळुन आलेने पो.हवा. २९२० गणेश मेदगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे आरोपी दिनेश हरीश शर्मा व त्याचे दोन पाहीजे साथीदार धनु व शिवन यांचे विरोधात गु.र.नं. १०४० / २०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५,१२ (अ) सह भारतीय टेलीग्राफ अॅक्ट कलम २१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने हे करीत आहेत. सदरची कारवाई ही मा. श्री. विनयकुमार चौबे सो. पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. संजय शिंदे साो. सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो. स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे). सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने पोलीस अंमलदार हजरत पठाण, गणेश मेदगे, नितीन गेंगजे, शाम बाबा, रामदास मोहीते, तौसीफ शेख व टी.ए.डब्ल्यु. चे पोपट हुलगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *