मनरेगाच्या अंमलबजावणीतील अडचणीवर सकारात्मक चर्चा

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ फेब्रुवारी २०२२

आंबेगाव


प्रशासन , किसान सभा , श्रमिक एकत्रित येत विशेष बैठक संपन्न.

पुणे जिल्ह्यातील,जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये,किसान सभेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून व प्रशासनाच्या सहकार्याने,रोजगार हमीची कामे अधिकाधिक सुरू होत आहे.

अजूनही काही गावात मनरेंगाची कामे सुरू करण्यासाठी संघटनेचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.

आंबेगाव आणि जुन्नर या,दोन्ही तालुक्यातील आदिवासी भागात असलेले,वनक्षेत्र लक्षात घेता,रोजगार हमीची अधिकाधिक कामे वनक्षेत्रात होऊ शकतात, व यातून रोजगार निर्मिती जशी होऊ शकते तसेच जंगलाचे संवर्धन ही होऊ शकते.

परंतु, वनविभागा अंतर्गत केली जाणारी रोजगार हमीची काही कामे, ही मजुरांना, रोजगाराच्या दृष्टीने परवडत नाहीत,असा अनुभव आहे.

याबाबत असलेल्या समस्या, समजुन घेऊन कोणत्या उपाययोजना करता येतील,यासाठी चावंड,ता.जुन्नर येथे, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, किसान सभेचे पदाधिकारी, चावंड गावातील रोजगार हमीच्या कामावर येणारे श्रमिक यांची एकत्रित बैठक ११ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली.

या बैठकीत वनविभाग, मनरेगा अंतर्गत जी कामे घेतात,त्या कामाचे जे अंदाजपत्रक तयार केले जाते,त्या अंदाजपत्रकाविषयी सांगोपांग चर्चा करण्यात आली.व यातून अंदाजपत्रक पुढील काळात कसे बनवता येईल याविषयी व मजुरांना त्यांच्या कामाचा योग्य दाम कसा मिळेल याविषयी चर्चा करून काही निर्णय घेण्यात आले.

Administration, Kisan Sabha, special meeting of workers coming together.
प्रशासन , किसान सभा , श्रमिक एकत्रित येत विशेष बैठक संपन्न .

या चर्चेतील प्रमुख निर्णय –

  1. वनविभाग जे अंदाजपत्रक तयार करते ते अंदाजपत्रक मनरेगाच्या दरसूची नुसार तयार करण्यात येईल.
  2. अंदाजपत्रकात जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे मातीचा स्तर, दगड गोटे मिश्रित माती, मऊ मुरूम, कठीण मुरूम, मोठे दगड, यानुसार दर लावले जातील,सरसकट फक्त मातीचा दर लावला जाणार नाही.
  3. वनविभागाच्या सर्व कामांबाबत प्रत्येकी एक-एक मॉडेल अंदाजपत्रक तयार करताना, पंचायत समिती मधील, तांत्रिक अधिकारी यात सर्व ते सहकार्य वनविभागास करतील.
  4. अंदाजपत्रक तयार करण्याच्या अगोदर कामाच्या शक्य त्या ठिकाणी डेमो घेण्याचे ठरले.
  5. महिना आणि ऋतुमानानुसार कामांचे वर्गीकरण करून त्या प्रमाणे शेल्फ निर्माण करण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल.

वनविभागाचे अधिकारी, रोजगार हमीच्या अभ्यासक,पंचायत समिती मधील तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक,किसान सभेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व रोजगार हमीवर काम करण्यास येणारे श्रमिक यांनी एकत्रित येत, काम करताना येणारया प्रशासकीय व तांत्रिक अडचणींवर मात काढत एक सुसंवादाचा यशस्वी प्रयत्न या बैठकीतून निर्माण झाला आहे.

या बैठकीला रोजगार हमीच्या तज्ञ व अभ्यासक सीमाताई काकडे, जुन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी शिंदे साहेब, आंबेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. गारगोटे साहेब, किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव डॉ.अमोल वाघमारे, जुन्नर विभागाचे वनपाल शशिकांत मडके, जुन्नर तालुका रोजगार हमी योजना समिती सदस्य आणि पुणे विभागीय आयुक्त वन हक्क समिती सदस्य किरण लोहकरे,जुन्नर पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी जितेंद्र भोर, आंबेगावचे सी.डी.इ.ओ. आशिष हुले, तांत्रिक अधिकारी लखन रेडेकर, वनरक्षक श्री.कवटे , श्री.आर.एस.माहोरे, पुणे जिल्हा किसान सभा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे, बाळू वायाळ,राजेंद्र घोडे, तालुका सचिव, लक्ष्मन जोशी, सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच माधुरीताई कोरडे, किसान सभा सदस्य कोंडीभाऊ बांबळे,तुळसाबाई उतळे रोजगार सेवक संदीप शेळकंदे, नारायण वायाळ, रोहिदास शेळकंदे. यांसह मोठ्या प्रमाणावर चावंड गावातील मजुर,ग्रामस्थ उपस्थित होते.

ही बैठक आयोजित करण्यामध्ये, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा साहेब, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.आयुष प्रसाद,जिल्हा परिषद नरेगा बी.डी.ओ.श्रीमती देव मॅडम, जुन्नर आणि आंबेगावचे तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *