आळेफाटा पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना ‘सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार’

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१६ एप्रिल २०२२ 

आळेफाटा


आळेफाटा (ता.जुन्नर) पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ‘सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार’ देण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार (दि. १५) रोजी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयात पार पडलेल्या बैठकीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच डिसेंबर २०२१ मध्ये आळेफाटा पोलिस ठाण्याचा पदभार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी स्वीकारल्यापासून अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आले आहे. यामध्ये आळेफाटा येथील साई इलेक्ट्रॉनिक्स दुकान हे दरोडेखोरांनी लुटले. या गुन्ह्याचा तपास पोलिसांना तात्काळ केला.तसेच बेल्हे येथील वैष्णवी पतसंस्थेतील ११४ तोळे झालेली सोन्याच्या चोरीचा तात्काळ तपास करण्यात आला.

त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांनी ३६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.१ वर्षांपूर्वी बस स्थानकात परप्रांतीय मजुरांचा खून करून पसार झालेल्या आरोपींला अहमदनगर येथून दारूच्या अड्ड्यावर जेरबंद करण्यात आळेफाटा पोलीस निरीक्षक प्रमुख क्षीरसागर यांचा पोलिसांना यश आले.वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळी गजाआड केली. क्षीरसागर यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार मिळाल्याने आळेफाटा पोलिसांची मान उंचावली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *