स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन

रामदास सांगळे
विभागीय संपादक
१८ ऑगस्ट २०२२

आळेफाटा


पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन (दि.१७) रोजी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी तहसीलदार रवींद्र सबनीस उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी बोलताना, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना गुणवत्ता वाढवायची असेल तर विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उतरणे गरजेचे आहे. स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण आपल्या अंगी येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन केले.पालक हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास निर्माण करणारा महत्त्वाचा घटक आहे , असे मत सहाय्यक गटविकास अधिकारी मा. हेमंत गरिबे यांनी मांडले. यावेळी संपूर्ण जुन्नर तालुक्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतचे १४० दिव्यांग विद्यार्थी व सोबत त्यांचे पालक उपस्थित होते. या स्पर्धां तीन गटात आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेमध्ये रंगभरण चित्रकला वेशभूषा सामुदायिक व वैयक्तिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

नृत्य स्पर्धेमध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांनी कलाविष्कार दाखवत समस्त प्रेक्षक वर्गाची जोरदार टाळ्यांच्या गजरात दाद मिळवली. जरी दिव्यांग विद्यार्थी असले तर त्यांचे सादरीकरण मनाला मोहून टाकणारे होते. आम्हीही काही करू शकतो, यशाची उत्तुंग शिखरं सर करू शकतो असा आत्मविश्वास या विद्यार्थ्यांमध्ये होता. यावेळी ईश्वरी खुळे या विद्यार्थिनीने “ए मेरे वतन के लोगो ” या देशभक्तीपर गायनाने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीमय केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाल विकास कार्यक्रमाधिकारी कुचिक, नायब तहसीलदार सचिन मुंढे, गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, कक्ष अधिकारी विरनक, अर्थ अधिकारी फुलसुंदर, कृषी अधिकारी बुधवंत, प्रशासन अधीक्षक शिंदे, सांख्यिकी विस्तार अधिकारी साबळे, कनिष्ठ सहाय्यक भालेराव आदी पंचायत समितीचे मान्यवर उपस्थित होते.

तसेच गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे आणि शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग, डुंबरे, विष्णू धोंडगे, व पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रेरणा व मार्गदर्शन गटविकास अधिकारी शरद माळी यांनी केले होते. या स्पर्धांमध्ये प्रथम ते पाचव्या क्रमांकापर्यंत प्रत्येक स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष तज्ञ शिक्षक विलास पिंगट तर प्रास्तविक समावेशित शिक्षण तज्ञ संगिता भुजबळ यांनी केले तर आभार प्रदर्शन समावेशित शिक्षण तज्ञ तोरकडी सुदेश यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *