भोसरीतील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य, दुचाकी वाहने घसरण्याच्या प्रमाणात वाढ

२९ ऑक्टोबर २०२२

भोसरी


भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरातील काही रस्त्यांवर माती, खडी विखुरलेली असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील दुचाकी वाहने घसरण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी वाहन चालक, नागरिकांमधून होत आहे.

भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक, पीसीएमटी चौक, लांडेवाडी चौक ते चांदणी चौकापर्यंतचा रस्ता, पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते धावडे वस्तीपर्यंतचा रस्ता, संत तुकाराम पॅलेससमोरील रस्ता, पीसीएमटी चौक ते भोसरी गावठाणाकडे जाणारा रस्ता, मारुती मंदिर चौक, इंद्रायणीनगरातील पालिकेच्या वैष्णोमाता प्राथमिक शाळेसमोरुन इंद्रायणीनगरकडे जाणारा रस्ता, संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुलसमोरील रस्ता, दिघीतील सह्याद्री कालनी क्रमांक तीन समोरील रस्ता, भारत मातानगर ते भोसरी-आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता आदींसह इतरही रस्त्यांवर खडी-माती पसरली असल्याचे पहायला मिळत आहे. काही रस्त्यावर पावसांमुळे वाहून आलेली माती, खडी आहे. तर बऱ्याच रस्त्यावर अर्धवट केलेल्या कामांतील राडारोडा वेळीच न उचलला गेल्यामुळे खडी-माती पसरली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *