पंतप्रधानांना प्रकरणाची तीव्रता माहिती आहे; मोदींच्या भेटीनंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया

०९ डिसेंबर २०२२


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान झाल्यानंतर २३ नोव्हेंबरला राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहलं होतं. राष्ट्रपती यांच्या सचिवांनी गृहमंत्रालयाकडे पत्र पाठवलं आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यालयातही पत्र पाठवण्यात आलं आहे. वाद वाढून, तेढ निर्माण होऊ नये ही भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आणि देशाची अस्मिता आहे.

राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून लवकरच तोडगा निघणं आवश्यक आहे. प्रक्रियेनुसार कारवाई होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रकरणाची तीव्रता माहिती आहे. सर्व खासदाराचं राज्यपालांवरील कारवाईबाबत एकमत आहे. भाजपाने राज्यपालांना सांगितलं नाही की,अशी वक्तव्य करा. त्याला पक्ष जबाबदार नाही. राज्यपालांनी अद्यापर्यंत माफी मागितली नाही, ही खंत आहे, असेही उदयनराजेंनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *