कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये ओझर येथील विघ्नहर मंदिर भाविकांसाठी बंद…

ओझर प्रतिनिधी :- मंगेश शेळके

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता महाराष्ट्र शासन व तहसीलदार हेमंत कोळेकर साहेबांच्या आदशान्वये श्री क्षेत्र ओझर व लेण्यांद्री येथील देवस्थान बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला .त्यानुसार भाविकांसाठी प्रवेश बंद असल्याचे फलक मंदिराच्या परिसरात लावण्यात आले आहेत. अंगारकी चतुर्थीचा योग लवकर येत नसल्याने या दिवशी नेहमीपेक्षा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक भक्त गणपती दर्शनासाठी येत असतात.बाप्पांची महापूजा ,अभिषेक, महाआरती इत्यादी धार्मिक कार्यक्रम देवस्थानच्या वतीने करण्यात आले.देवस्थानच्या वतीने जरी भाविकांना देवदर्शन बंद असले तरी तुरळक प्रमाणात भाविकांची देवदर्शनासाठी ये-जा चालूच होती.मंदिर प्रवेशद्वाराच्या पायरीवरूनच भक्तांना कोरोनाचे सर्व नियम पाळूनच दर्शन दिले जात होते. यावेळी ओतूर पोलिस स्टेशनचे पो.नाईक श्री.बर्डे व पो.काँन्सटेबल श्री.बोर्हाडे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून गणेश भक्तांना व देवस्थानच्या कर्मचार्यांना योग्य त्या सुचना दिल्या .यावेळी देवदर्शनासाठी मंदिरामध्ये एकही गणेश भक्त येऊ न देण्याची खबरदारी देवस्थान व पोलिसांच्या वतीने घेण्यात आली. यामुळे मंदीरामध्ये एक प्रकारची भयाण शांतता दिसून येत होती. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही मांडे साहेब उपाध्यक्ष रंगनाथ रवळे ,खजिनदार किशोर कवडे ,कैलास घेगडे ,श्री.पंडीत , गोविंद कवडे ,विकास कवडे देवस्थानचे सर्व पदाधिकारी कर्मचारी ,ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री. बर्डे ,पोलीस काँन्सस्टेबल श्री. बोर्हाडे ,ओझरकर ग्रामस्थ व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते . तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विघ्नहर्ता मंदीराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जो सुबक ,सुंदर ,रेखीव नक्षीकाम व मजबूत दरवाजा बसविण्यात आला , त्याचे अकोला जि.अहमदनगर येथील श्री. दत्तात्रयशेठ चोथवे व त्यांचे पुत्र रवींद्रशेठ दत्तात्रय चोथवे गणेश साँ.मिल चे मालक यांचेही विघ्नहर देवस्थानच्या वतीने गुणगौरव व स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *