अपघातात मृत्यू पावलेल्या पोलीस हवालदार यांच्या कुटुंबियांना पोलिस मित्राकडून आर्थिक मदत

सन 2007 मध्ये पोलीस दलामध्ये भरती झालेले पोलीस हवालदार कै. योगेश ढवळे यांचा दिनांक 09/08/2023 रोजी नाशिक पुणे हायवे वर चाकण येथे अपघात झाला होता त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.पोलीस हवालदार योगेश ढवळे चाकण वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या परिवाराला सर 2007 सालच्या सर्व बॅचमेंट मित्रांनी तसेच खेड आंबेगाव येथील सर्व पोलीस बांधवांनी निधी जमा करून सदर निधी एकूण 4 लाख 50 हजार रुपये ही आज रोजी योगेश ढवळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
त्यावेळी योगेश याच्या कुटुंबाकडून सर्व मित्र वर्गांचे आभार व्यक्त केले आहेत.यावेळी psi विकास मडके चाकण पोलीस स्टेशन, पोलीस नाईक सचिन सोनपेठे, पोलीस नाईक नितीन पवार, पोलीस नाईक भैरोबा यादव, पोलीस नाईक महादू कोठावळे, पोलीस नाईक संदीप मांडवी, पोलीस नाईक श्रीकांत होले असे सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *