सहाय्यक अभियंता, शिरूर, श्रेणी-१, सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचा आंदोलनांचा इशारा

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १३/०९/२०२३

शिरूर शहरातुन जाणाऱ्या पाबळ फाटा ते मोतीनाला रस्त्याची गेली काही महिन्यांपासून फार दुरावस्था झालेली आहे. शिरूर तालुक्याच्या पच्छिमेकडील अनेक गावांना हा मुख्य रस्ता असून, हाच रस्ता पुढे जुन्नर, आंबेगाव व राजगुरुनगर या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडतो. हाच रस्ता एकीकडे अष्टविनायक महामार्ग व दुसरीकडे बारा ज्योतिर्लिंगांपैकी भिमामाशंकर या महत्त्वाच्या तीर्थ क्षेत्रांना जोडला जातो. त्यामुळे या रस्त्यावरून स्थानिक वाहनांशिवाय बाहेरील वाहनांचीही खूप वर्दळ असते.


परंतु सध्या त्याची पाबळ फाटा चौक ते मोतीनाला इथपर्यंत खूप दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे येथील पद‌पथ देखील अस्तित्वात राहिलेले नाहीत. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना आनंद सोसायटी जवळील रस्त्यातील खड्ड्यांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे वाचविण्याच्या अंदाजामध्ये अनेक अपघातसुद्धा या रस्त्याला झालेले आहेत. शालेय विद्यार्थी सायकल वरून जातात, वयोवृद्ध ही येथून प्रवास करतात. या सर्वांच्याच या खराब रस्त्याबाबत खूप तक्रारी आहेत.
त्यामुळे जर या रस्त्याकडे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले नाही व तो चांगला केला नाही, तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा, मनसेचे पुणे जिल्हाउपाध्यक्ष महिबुब सय्यद, प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, मनसेचे माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे, मनसेचे जनहित शहराध्यक्ष रवी लेंडे यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *