शिरूर । कर्मवीर अण्णा यांची ६२ वी पुण्यतिथी साध्या पद्धतीने साजरी..

आज रविवार दि .९ मे २०२१. कर्मवीर अण्णा यांची ६२ वी  पुण्यतिथी.
  भारतमातेचे थोर सुपुत्र ,आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेचे संस्थापक , महाराष्ट्राचे बुकर टी वॉशींग्टन ,थोर शिक्षण महर्षी , शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाड्या पर्यंत पोहचवणारे आधुनिक भगिरथ, प्रबोधनाची धगधगती मशाल , सत्यशोधक चळवळीचे मेरुमणी , वसतीगृहयुक्त शिक्षणाचे आद्यजनक , ‘  कमवा आणि शिका ‘ योजनेचे शिल्पकार ,आधी केले मग सांगितले हा बाणा , मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमान जागृत करणारे , उक्ती आणि कृती यांच्यात एकवाक्यता साधणारे विचारवंत , श्रमप्रतिष्ठेचे मूल्य आजन्म जोपासणारे आचारवंत , विज्ञाननिष्ठ विचारांचे ऐश्वर्य ,महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे युगप्रर्वतक , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६२ व्या पुण्यस्मरण दिनास  विनम्र अभिवादन !! कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करत, त्यांच्या आचारणाप्रमाणेच आपणही वागण्याचा सल्ला, उपस्थित सर्व रयत सेवकांना, मलठण येथील न्यु इंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य, एस एस पाटील यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *