एक राखी आपल्या सैनिकांसाठी, जिजामाता संस्थेच्या वतीने माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
एक राखी आपल्या भारतीय माजी सैनिकांसाठी हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम नुकताच नारायणगावात उत्साहात आयोजित करण्यात आला.
जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमास जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष डी के भुजबळ, माजी सैनिक उमेश अवचट, सतीश भुजबळ, भगवान काळे, एकनाथ वाजगे, सुभाष काकडे, संतोष घोडके, श्री.बाळासो मुळे, शिवाजी पाटे, किसन ढवळे, पंढरीनाथ घोटकर, श्री तांबे, श्री थोरवे उपस्थित होते. संस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर, अध्यक्ष योगिनीताई खैरे, उपाध्यक्ष स्वातीताई औटी, संचालिका सुशीला विटे, सुरेखा वाजगे, ज्योतीताई गांधी, भारती खीवंसरा, पुष्पाताई खैरे, शितल ठुसे, डॉ.पल्लवीताई राऊत अनुपमा पाटे, नीता बोरकर, छाया केदारी, सुवर्णा मेहेर, अरुणा वाघुले, सविता वाबळे, शिला शेलार या महिला भगिनींनी माजी सैनिकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.शमीम इनामदार यांनी केले व संस्थेच्या अध्यक्षा योगिनी खैरे यांनी उपस्थित्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *