पिंपरी-चिंचवड मध्ये पार पडला उद्धवश्री पुरस्कार २०२३ सोहळा

दिनांक ०१ सप्टेंबर २०२३

पिंपरी चिंचवड शहरात उद्धव श्री पुरस्कार 2023 वितरण सोहळा मोठ्या दिमाख्यात पार पडला.समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी उद्धव श्री पुरस्कार समितीच्या तर्फे उद्धव श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने मागील 23 वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो.विशेष म्हणजे ह्या  वर्षी एकूण 18 पुरस्कारार्थींना उद्धव श्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तसेच प्रवक्त्या सुषमा अंधारे,ज्येष्ठ नेते रवींद्र मिरलेकर तसेच सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली तसेच त्यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचे सन्मान करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा पिंपरी एथिल आचार्य अत्रे सभागृहात पार पडला.या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन उद्धव श्री पुरस्कार समितीचे अध्यक्ष,माजी आमदार व पुणे जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार तसेच उद्धव श्री पुरस्कार समितीचे सचिव व पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख गुलाब गरुड यांच्याकडून करण्यात आले.यावर्षीच्या उद्धव श्री पुरस्कार चे मानकरी शैक्षणिक क्षेत्रातील राजीव जगताप,कामगार नेते कैलास कदम,विमान वाहतूक प्राधिकरण चे तय्यब शेख,अभिनेत्री माधुरी पवार,नृत्यकलामध्ये ऐश्वर्या काळे,निर्भीड पत्रकारिता मध्ये  आपला आवाज न्यूज चे पत्रकार प्रसन्न तरडे,उद्योग क्षेत्रात रणजीत काकडे, अधत्यामिक हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे,वारकरी संगीतात रघुनाथजी खंडाळकर,क्रीडा क्षेत्रात भारत वावळ व मदन कोठुळे,आदर्श पीएमपीएल नियंत्रक काळूराम लांडगे,हृदयरोग तज्ञ राजू शेट्टी,वैद्यकीय क्षेत्रामधील वायसीएम हॉस्पिटल चे मुख्यव्यस्तपक राजेंद्र वाबळे,आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यात विनोद पाटील,आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रवीण बडे,सिने अभिनेते माधव अभ्यंकर,तसेच सिने बालकलाकार प्रज्ञा फडतरे,यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या पुरस्कार सोहळ्यास पिंपरी चिंचवड शहर संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेविका मीनल यादव,धनंजय आल्हाट,संतोष म्हात्रे व इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *