आग्रा ते राजगड ‘गरुड झेप’ मोहिमेचे नारायणगावात उत्साहात स्वागत, सरनौबत गोळे यांच्या वंशजांचा सन्मान…

नारायणगाव :- (किरण वाजगे)
आग्रा ते राजगड गरुड झेप मोहिमेचे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव येथे सलग चौथ्या वर्षी उत्साहात स्वागत करण्यात आले. गरुड झेप मोहिमेचे आयोजन मारुती आबा गोळे यांनी केले असून त्यांचे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी सरपंच योगेश पाटे, शिवसेना तालुकाप्रमुख (ठाकरे गट) व बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, विघ्नहर चे संचालक संतोष नाना खैरे, विक्रांत पतसंस्थेचे चेअरमन संतोष वाजगे, माजी उपसरपंच आरिफ आतार, संतोष दांगट, गणेश पाटे, संतोष पाटे, हेमंत कोल्हे, ज्ञानेश्वर औटी, भागेश्वर डेरे, किरण ताजणे, आबा कोल्हे, अक्षय वाव्हळ, संतोष बाळसराफ, पिंटू दिवटे योगेश गांधी आकाश कनस्कर निरंजन भोसले ईश्वर पाटे भागेश्वर डेरे आदी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज ३५६ वर्षापूर्वी १७ ऑगस्ट या दिवशी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन नजर कैदेतून निसटले होते. म्हणूनच दरवर्षी गरुड झेप मोहिमेची १७ ऑगस्ट या दिवशी आग्रा येथून सुरुवात केली जाते. त्यानंतर आग्रा, ग्वालियर (मध्यप्रदेश) चांदवड (महाराष्ट्र), नाशिक, सिन्नर, नारायणगाव मार्गे १२५३ किलोमीटरचा पायी प्रवास करून २९ ऑगस्टला राजगड येथे पोहोचते. मोहिमेत मोठ्या संख्येने शिवभक्त सामील झालेले आहेत.
नुकतीच गरुड झेप मोहिमेची नारायणगाव येथे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली मोहिमेत सहभागी सर्व शिवभक्तांचे येथील कळमजाई झांज पथका द्वारे पारंपरिक ढोल ताशा झांज आदी वाद्यांच्या गजरात स्वागत करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत स्फूर्तीदायक प्रात्यक्षिके करण्यात आली. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

 


—————————————-

गरुड झेप मोहिमेचे आयोजक मारुती आबा गोळे यांचा परिचय
—————————————–
•मारुती आबा गोळे हे हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे १४ वे वंशज.
•जगभरातील १४ देशातील १३६८ गडांचा स्वतः जाऊन प्रत्यक्ष अभ्यास.
•गडकोटाचे ३ लाख ४८ हजार फोटो.
•२०१७ राजगडला मानवंदना देण्यासाठी आग्रा ते राजगड ३५ दिवसात पायी प्रवास.
•२०२१ आग्रा ते राजगड १०० जणांसह १३ दिवसात गरुड झेप मोहीम.
•डिसेंबर २१ ते जानेवारी २३ छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिग्विजयाला मानवंदनासाठी जिंजी (तामिळनाडू) ते सिंहगड पायी प्रवास.
•सिंहगड १९ तासात अकरा वेळा, राजगड २१ तासात १३ वेळा, तोरणा १६ तासात ९ वेळा चढाई.
•स्व. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘अटल साधना’ पुरस्काराने सन्मानित.
•२०२२ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून गरुड झेप मोहिमेचे स्वागत.
•——————————————
——————————————
छत्रपती शिवरायांची सेवा करण्याचे भाग्य – योगेश पाटे
अध्यक्ष – राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान
—————————————-
छत्रपतींची सेवा करण्याचे भाग्य मिळावे या उद्देशाने राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर असते. तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण स्मरणात राहावी यासाठी विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविणे, जुन्नर तालुक्यातून अथवा बाहेरून आलेल्या वेगवेगळ्या मोहिमांचे नारायणगावात स्वागत करून नाश्ता, चहा, जेवण व मुक्कामाची सोय करून आदरातिथ्य करणे हे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान आपले कर्तव्य समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *