पिंपरी पेंढार येथे तरुणांनी एकत्र येऊन एक हजार झाडे लावण्याचा ध्यास घेतला हाती.

प्रतिनिधी-कैलास बोडके

पिंपरी पेंढार(ता. जुन्नर) येथील तरुणांनी ‘पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशन’ च्या माध्यमातुन तरुणांना एकत्र करुन गेली तीन वर्षापासून वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेऊन तो राबविला जात आहे याही वर्षी एक हजारपेक्षा अधिक झाडे लावण्याचा मानस आहे त्याची सुरुवात आज वटपोर्णिमाचे औचित्य साधुन सरपंच सुरेखाताई वेठेकर यांचे हस्ते केली.


ग्रामपंचायत पिंपरी पेंढार, नवलेवाडी ग्रामस्थ, यांच्या सहकार्याने पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशनने एक पाऊल माणुसकीसाठी या धर्तीवर जलसंधारण, रक्तदान शिबिर, मेडिकल कॅम्प, गावकरिता स्वर्गरथ, गावचे पाणीप्रश्न, ग्रामस्वच्छता अभियान, गावकरिता रूग्णवाहिका, वृक्षारोपण, व्यायामशाळा, आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर, निराधार व्यक्तीसाठी अन्नदानाची व्यवस्था, गावातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन अशा प्रकारचे ध्येय अमलात अनन्याचा मानस असुन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये स्वतःहुन लहानापासून वयोवृद्धपर्यंत सर्वच जणांनी हिरहिरीने पुढाकार घेऊन गाव आणि परिसरामध्ये श्रमदान करून स्वच्छतेचे काम हाती घेतले असुन त्याचाच एक भाग म्हणुन आज नवलेवाडी येथील स्मशानभुमी परिसरात असणारे दगडगोटे, पालापाचोळा, सपाटीकरण करून गायराण जमिनीत सीताफळ आंबा आदि वृक्षाची लागवड करण्यात आली.

Advertise


याप्रसंगी उपसरपंच अमोल वंडेकर, बाळशिराम खिल्लारी, कामगर तलाठी संजय गारकर, रोहिदास वेठेकर, सरदार नवले, अरविंद नवले, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलचे संस्थापक संजय टेंभे, महावीर पोखरना, नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंत वाव्हळ, उपाध्यक्ष राहुल शेलार, पंकज चंगेडिया सामाजिक कार्यकर्ते डी बी वाळूज आदि मान्यवर तसेच फाउंडेशनचे सर्व सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *