बनारायणगाव : नावट पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला जेरबंद

नारायणगाव पोलीस स्टेशन व एलसीबी ची कारवाई

नारायणगाव (ता. जुन्नर) येथे हातात कोयता घेऊन व कमरेला पिस्तूल लावून दहशत करणाऱ्या एक जणाला नारायणगाव पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वारूळवाडी येथील ठाकरवाडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवार दिनांक २३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एक जण बनावट पिस्तूल कमरेला लावून हातात कोयता घेऊन दहशत करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नारायणगाव पोलिसांसह ठाकरवाडी येथे जाऊन, कमरेला पिस्तूल लावून व हातात कोयता घेऊन हातवारे करत दहशत करताना आढळून आलेल्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव अनिल सुनील जाधव (रा. ठाकरवस्ती, वारुळवाडी, तालुका जुन्नर) असे असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार दाते करत असून ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस कर्मचारी मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे, हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *