गुन्हे नियंत्रणासाठी शहरात रात्री दोन ते पहाटे चार दरम्यान चौकाचौकात पोलीस पहारा

२१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


आयटी पार्क आणि एमआयडीसीतील लहान – मोठे उद्योग रात्रंदिवस सुरू राहत असल्याने पिंपरी चिंचवड शहर रात्रभर जागे असल्याचे दिसून येते . शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर रहदारी सुरूच असते रात्री दोन ते पहाटे चार या कालावधीत या चौक तसेच रस्त्यांवरून वाहने तुरळक ये- जा करत असल्याने शहर झोपल्याचा भास होतो . याच वेळेत गुन्हे घडण्याची शक्यता असते त्यामुळे शहरात रात्री विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी केली जाते . संशय आल्यास ताब्यात घेतले जाते . पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १८ पोलिस ठाणे आहेत . प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून रात्री गस्त सुरू असते त्यामुळे सुरक्षित वाटून नागरिकांना दिलासा मिळतो . लुटमारीच्या घटना कमी होण्यास मदत होत आहे . कामगारांना अडवून कामगारांना त्यांच्याकडील रोकड , मोबाइल असा ऐवज लुटून नेण्याच्या घटना समोर आल्या . त्यामुळे पोलिसांनी गस्तीवर भर दिला आहे.

रात्रीच्या गस्तीसाठी मोठा फौजफाटा पोलिसांसोबत रात्री एक वाजतानंतर ‘ लोकमत’ने पाहणी केली . कामावरून घरी जाणारे कामगार , गावाकडून परतलेले नागरिक तसेच सफाई कर्मचारी चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर दिसून आले . पिंपरी कॅम्प येथे . शगुन चौक परिसरात काही दुकानांचे काम सुरू होते . पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली . काम थांबवा , दिवसा काम करून घ्या , अशी सूचना पोलिसांनी केली . त्यानंतर दुकानाचे काम संबंधितांनी बंद केले .


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *