श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन समारोह उत्साहात संपन्न

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच श्री प्राथमिक जैन विद्यामंदिर यांचा संयुक्तरित्या स्वातंत्र्य दिन समारोह उत्साहात संपन्न झाला .
याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष प्रकाशचंदजी चोपडा, प्रकाशचंदजी बंब,रमणलालजी सिंघवी, ऋषभजी चोपडा ,प्राचार्य विक्रम काळे ,मुख्याध्यापिका नलिनी कर्नावट उपस्थित होते .


युवा उद्योजक ऋषभजी चोपडा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . तसेच प्रकाशचंदजी चोपडा त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मान्यवर पाहुण्यांना संचलनातून मानवंदना दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वांग सुंदर सामुदायिक कवायत सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विक्रम काळे यांनी केले ,तसेच विद्यार्थिनिंनी ये देश मेरी जान , ईमान है मेरा l व मेरा मुल्क मेरा देश मेरा ऐ वतन ही समूहगीते सादर केली. तसेच तन्वी उंप, प्रेम कुंभार या विदयार्थ्यांनी भाषण तर साधना भालेकर व निवृत्ती गोडसे यांनी अप्रतिम देशभक्तीपर गीत सादर केले.

यानिमित्ताने सन १९९० च्या  बॅचचे माजी विद्यार्थी मोठया संख्येने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संयोजन पर्यवेक्षक शशिकांत हुले, विभाग प्रमुख मीना मेरुकर व शिक्षक प्रतिनिधी विठ्ठल शेवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका नलिनी कर्नावट यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *