खडतर डोंगरदऱ्यात सह्याद्री ऑफ रोड आयोजित स्पर्धेत पुण्याचे दौलत चौधरींनी मारली बाजी

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२३ जुलै २०२२

पुणे


पुण्यातील अग्रगण्य संस्था सह्याद्री ऑफरोड यांच्या वतीने नुकत्याच पुण्यातील वाघोली येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्धाटन महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती सुनेत्राताई अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा कोल्हापूर, सातारा ,मुंबई आणि सिलवासा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने भरविण्यात आली होती. तेथेही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता

या स्पर्धेत जीप गाडीतून डोंगर, दरी, पाणी अशा कठीण भागातून खडरत डोंगर दऱ्यातून गाडी चालवली जाते. या स्पर्धेत एकूण ४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. अतिशय अटातटीने झालेल्या स्पर्धेत पुण्याच्या दौलत चौधरी यांनी पहिला क्रमांक पटकावला. विशेष बाब म्हणजे त्यांचेच चिरंजीव गौरव दौलत चौधरी याने तिसरा क्रमांक पटकावला आणि सर्वांची मने जिंकली. या पिता पुत्राचा सन्मान त्यांना प्रथम क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह आणि बक्षीस देऊन करण्यात आला. या पिता पुत्रांनी या स्पर्धेसाठी जीवतोड मेहनत घेतली होती. त्याचेच फळ त्यांना मिळाले. त्यांच्या या जिद्दीने मिळवलेल्या यशाचे सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *