शासनाने लावला समतादुतांच्या जीवाशी खेळ पायी लॉन्ग मार्चमध्ये दोन समतादूतांची प्रकृती बिघडली

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व सामाजिक न्याय विभाग यांच्यामार्फत गेल्या नऊ वर्षापासून कामकाज करणाऱ्या समतादुतांच्या प्रलंबित मागण्यासाठी समतादूतांनी पुणे ते मंत्रालय मुंबई पायी लॉंगमार्च काढलेला आहे.या लॉंग मार्चच्या आज दुसऱ्या दिवशी समतादूत अर्चना चौरे ,समतादूत कल्पना बेलसरे यांची प्रकृती बिघडली त्यांना दवाखान्यात पोहचण्यासाठी विलंब लागला असता तर जीवाशी मुकावे लागले असते अद्याप शासनाने समतादूत यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नसून बार्टीचे प्रशासनही रेड्याची कातडी पांघळून बसलेले असल्याचे पहावयास मिळते.असच म्हणावे लागेल
समतादूतांच्या प्रमुख मागण्या :-काय आहे ते पाहूयात.


1)समतादूत यांच्या समायोजन विषयी स्वयंस्पष्ट अहवाल बार्टी स्तरावरून मंत्रालय कक्ष अधिकारी यांना 18 मे 2023 रोजी पाठविण्यात आला . अहवाल प्रलंबित न ठेवता शासनाने स्वीकारून समतादूत यांचे समाजकल्याण विभागामध्ये समायोजन 15 ऑगस्ट 2023 पूर्वी करण्यात यावे.
2) समतादूत यांना समायोजनाचे लाभ 2016 पासून देण्यात यावे.
3))समतादूत यांची पगारवाढ शासन आदेशामध्ये नमूद 33900 पूर्ण पगार लागू करण्यात यावी.सदरील पगार बार्टी आस्थापने मार्फत देण्यात यावा कोणत्याही त्रयस्थ कंपनी मार्फत देऊ नये
4) समतादूत यांना पगार व्यतिरिक्त TA. DA लागू करण्यासंदर्भात बार्टी संस्थेच्या नियामक मंडळात मंजुरी घेऊन निर्णय घेऊन TA.DA लागू करण्यात यावा.
5)सर्व समतादूत यांचे विमा काढून समतादूतांना कायमचे विमा संरक्षण देण्यात यावे.
6)पगारवाढ व समायोजन करतांना कोणत्याही समतादूत यांना वगळण्यात येऊ नये.
7)समतादूत पगारवाढ मार्च 2023 पासून लागू करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *