आमचा उमेदवार निवडून येईल, अशी खात्री – दिलीप वळसे पाटील

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१४ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीसह भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने पक्षचिन्ह मिळूनही उमेदवार उभा केलेला नाही. या ठिकाणी भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. यावर दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, निवडणुकीत दोन किंवा दोनपेक्षा अधिक उमेदवार नेहमीच असतात. यावेळी या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना होतो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आम्ही संयुक्त उमेदवार दिला आहे. त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. आमचा उमेदवार निवडून येईल, अशी आम्हाला खात्री आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *