आंबेगाव : निगडाळे येथील ग्रामपंचायत कार्यालय व जि.प. प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा

आंबेगाव –
प्रतिनिधी
मोसीन काठेवाडी
निगडाळे (ता.आंबेगाव) या पश्चिम आदिवासी भागात ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन साजरा करण्यात आला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज,आदिवासी लोकनायक बिरसा मुंडा व क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेसह प्रभातफेरी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
‘एक तीर एक कमान,सारे आदिवासी एक समान’, ‘जय जोहार-जय आदिवासी’, ‘वनवासी नही हम आदिवासी हैं-इस देश के मूलनिवासी हैं’, ‘आमची संस्कृती आमचा अभिमान-मी आदिवासी माझा स्वाभिमान’, ‘जय बिरसा-जय राघोजी’ आदी घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज,लोकनायक बिरसा मुंडा व क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच नितीन लोहकरे व प्राथमिक शाळेत शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आदिवासी नेते काळू कुऱ्हाडे,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष वैभव लोहकरे,मुख्याध्यापिका शोभा जाधव,अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे,वन विभागाचे बाळासाहेब भोईर,शिक्षक संतोष थोरात,अरुण लोहकरे,हिराबाई केंगले,सचिन कुऱ्हाडे,सुनिल कुऱ्हाडे व शालेय विद्याथी उपस्थित होते.


याप्रसंगी शाळा राबवत असलेल्या ‘एक वही एक पेन’ उपक्रमास प्रतिसाद देत कळंब (ता.आंबेगाव) येथील ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन,पेन्सिल व खोडरबरचे वाटप करण्यात आले.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपारिक आदिवासी वेशभूषा केल्या होत्या.विद्यार्थी आर्यन तिटकारे,पूजा भोमाळे,आदित्य कुऱ्हाडे,सार्थक भोमाळे यांनी भाषणे केली.आदिवासी दिनाचे महत्त्व,आदिवासींच्या परंपरा,संस्कृती,आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा,राघोजी भांगरे व इतर आदिवासी क्रांतिकारकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यावर मारुती लोहकरे,नितीन लोहकरे,बाळासाहेब भोईर,नंदाबाई लोहकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संयोजन उमेश लोहकरे, रामदास कुऱ्हाडे,संतोष लोहकरे,जालिंदर कुऱ्हाडे,बाळासाहेब लोहकरे,लिलाबाई लोहकरे,वंदना गेंगजे,भिवराज पवार,मंगेश लोहकरे,स्वप्नील अस्वले यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक संतोष थोरात यांनी केले व आभार मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *