घोडेगाव येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज एकवटला

घोडेगाव
मोसीन काठेवाडी

आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती घोडेगाव आयोजित ९ ऑगस्ट,जागतिक आदिवासी दिन घोडेगाव येथे पंचायत समिती कार्यालयासमोरील क्रांतीस्तंभाला अभिवादन करुन रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या रॅली मध्ये आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषा करून उपस्थित होते ही रॅली अहिल्याबाई होळकर चौक शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला अभिवादन करुन लक्ष्मीबाई चौक मार्गे वनमाला मंगल कार्यालय येथे सभेमध्ये रुपांतर झाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष तिरपाड गाव ता.आंबेगाव येथील लोकनियुक्त सरपंच सोमा दाते हे होते.

पुणे जिल्हा मातृशक्तीचे प्रमुख स्वागताध्यक्ष उमाताई मते या लाभल्या तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ.संजय दाभाडे यांनी आदिवासी समाजासमोर असलेली आव्हाने यावर आपल्या मनोगतातून भावना व्यक्त केल्या तसेच दुसरे वक्ते डॉ.विलास गवारी यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान या विषयावर त्यांनी दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी समाज्याच्या क्रांतिकारकांचे योगदान विस्तृतपणे मांडले
या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती आंबेगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी पुणे जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील , भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे विष्णू काका हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देविदास दरेकर, अनेक आदिवासी गावचे सरपंच आणि समाज बांधव उपस्थित होते.

जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिरसा ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांनी कष्ट घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *