बचतगटाची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात सपंन्न…

भिमाशंकर :
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुका आदिवासी पश्चिमपट्टयात निगडाळे (ता आंबेगाव)येथे दक्षता विभाग निगडाळे व ताथवडीदेवी तेंरुगण विभागाची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात सपंन्न झाली. कोरोनाच्या वातावरणामुळे मागील वर्षी सभा होऊ शकली नाही ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांचे आर्थिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गट विभाग संघ या वाटचालीतून हळूवारपणे विकासाच्या नव्या दिशेकडे जाणाऱ्या वाटचालीतून गाव ते वाडीवस्तीपर्यत त्यांचे जीवनमान उंचविण्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी असणाऱ्या विभागाची वार्षिक सभा होणे हे महत्त्वाचे असल्याने या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं सिध्द; संघाच्या संघाच्या दक्षता विभाग निगडाळे पदधिकारी पदी सुरेखा विनायक लोहकरे यांची तर ताथवडीदेवी विभाग तेरुगण पदधिकारीपदी यशोदा बाळू कोढवळे यांची निवड झाली. दक्षता विभाग निगडाळे विभागाच्या अध्यक्षपदी कांता सिताराम लोहकरे,व सचिवपदी मिरा आशोक पोटे यांची .तर ताथवडीदेवी तेरुगण विभाग अध्यक्षपदी मिराबाई दत्तात्रय कोकाटे व सचिवपदी वैशाली सखाराम असवले या़ची बिनविरोध निवड झाली.

यावेळी गटांचे आँडीट वाचन करून गट प्रगतीचा आढावा सादरीकरण करण्यात आले व कोरोना काळात आलेली आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मरगळ कमी करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले. यावेळी संघकार्यकर्ते कल्पना एरंडे सुहास वाघ हरीभाऊ गेंगजे शिवाजी शेटे यांच्यासह दहा बचत गटातील संघटिका उपस्थित होत्या.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *