परदेशी पक्ष्यांचे शहरात आगमन

११ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दरवर्षी हिवाळ्यामध्ये बर्फाळ आणि अतिथंड वातावरणातील पक्षी सुरक्षित तसेच संतुलित वातावरणाच्या शोधात स्थलांतर करीत असतात . पिंपरी चिंचवड शहरातदेखील या परदेशी व परराज्यातील पाहुण्यांचे आगमन झाले आहे . शहरातील पाणथळ जागांच्या ठिकाणी हे पक्षी पाहावयास मिळत आहेत. अनेक ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास शहरात टाटा मोटर्सचे सुमंत सरोवर , वाल्हेकरवाडी , रावेत , संभाजीनगर बर्ड व्हॅली , चिखली मैलाशुद्धिकरण केंद्र आणि दगडांच्या खाणी आहेत.

चिंचवडगावात नदीकाठी धनेश्वर मंदिर व गावडे घाट , चऱ्हाली , रहाटणी , थेरगाव बोट क्लब , सीएमई इंजिनिअरींग कॉलेज याठिकाणच्या पाणथळी हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांचा अधिवास आढळतो . अन्नाच्या कमतरतेमुळे स्थलांतर हे पक्षी ज्या ठिकाणाहून स्थलांतर करतात , त्याठिकाणी बर्फामुळे अन्नाची कमतरता आणि हवामान बदल यामुळे ते स्थलांतर करतात . तसेच , विणीच्या काळात घरटे बांधण्यास सुरक्षित जागा व परिस्थिती नसल्याने या पक्ष्यांचे स्थलांतरीत होते . युरोपच्या पक्ष्यांना पिंपरीची भुरळ शहरात युरोप , रशिया , सैबेरिया असे परदेशी तर हिमालय , मेघालय , उत्तर प्रदेश येथून पक्ष्यांचे स्थलांतर होते . शेकाट्या , तांबूल , मोन्टाग्युचा भोवत्या , लाल अंजन , नकटा , थपाट्या आदी पक्ष्यांचा समावेश आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *