शॉर्टसर्किटने एक एकर ऊस जळाला : लाखो रुपयांचे नुकसान

रामदास सांगळे
विभागीय संपादक
८ फेब्रुवारी २०२२

वडगाव कांदळी


वडगाव कांदळी (ता. जुन्नर ) येथील लांडगे मळा शिवारात प्रसाद पांडुरंग कुऱ्हाडे यांचा गट नंबर ३०८ मधील एक एकर ऊस मंगळवारी (दि.८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने जळाला. वडगाव कांदळी येथे कुऱ्हाडे यांच्या शेतात इलेक्ट्रिक रोहित्र (डीपी) असून या डीपीच्या वायरची व फ्युज बॉक्सची दुरावस्था झाली आहे. कुऱ्हाडे यांनी वारंवार तक्रार करूनही तिची दुरुस्ती केली नसल्याने शॉर्टसर्किटने आग लागून उसाचे मोठे नुकसान झाले असल्याचे प्रसाद कुऱ्हाडे यांनी सांगितले. यामध्ये कुऱ्हाडे यांचा एक एकर ऊस जळाला असून अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणने नुसकान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

रोहित्र व फ्युजची दुरावस्था

परिसरात सर्व ठिकाणी असणाऱ्या डीपी मध्ये फ्युज बॉक्स ची दुरावस्था झाली असून अनेक बॉक्समध्ये फ्युज नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर अनेक ठिकाणी केबलचे आवरण उघडे पडले असून ते धोकादायक असल्याचे दिसत आहे. फ्युज व केबल महावितरण दुरुस्त करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *