रांजणगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे

कारेगाव/शिरूर : दि. २६/०७/२०२३.

शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलिसांनी, मौजे कारेगाव येथे अवैध्यरीत्या दारू विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी कारवाई केली असून, त्यांच्याकडून देशी व इतर प्रकारची दारू जप्त केलेली आहे.
एका कारवाईत गजानन वसंत चाळक, वय २७ वर्ष, सध्या राहणार कारेगाव, हा इसम कारेगाव येथील स्मशानभूमी जवळच्या स्वीटहोम लगतच्या पत्राशेडमध्ये अवैधरित्या दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडून व्हिस्की व देशी दारू किंमत रू ३७४०/- एवढा माळ जप्त करण्यात आलाय.
तर दुसरी कारवाई ही कारेगावच्या मराठी शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या पत्राशेड मध्ये करण्यात आलीय. त्यात सुनील शालिग्राम अबोरे, वय ४० वर्ष, सध्या राहणार कारेगाव, या इसमावर करण्यात आलीय. या कारवाईत देशी दारूच्या ५१ बाटल्या आढळून आल्या, ज्यांची किंमत ३२९० रू आहे.
सदरची कारवाई ही रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन चा नव्यानेच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पो. हवा. विलास आंबेकर व संतोष औटी तसेच पो. शि. विजय शिंदे यांनी केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *