बेल्ह्यात आदिवासी संस्कृतीचे घडले दर्शन

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०९ ऑगस्ट २०२२

बेल्हे


बेल्हे (ता.जुन्नर) येथे आदिवासी दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक नृत्य सादर केले. या नृत्यातून विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीच्या जीवनाचे दर्शन घडवले. या दिनानिमित्त बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,नृत्यकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक आदिवासी पेहराव करून नृत्य सादर केले. आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.


शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प केंद्र अंतर्गत शाळेत जव्हार,डहाणू,पालघर,घोडेगाव, येथील ३२६ आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांचे राहणीमान सुधारावे तसेच शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आदिवासींसाठी ही योजना सुरु केली आहे. या विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानत आदिवासी दिन उत्साह साजरा केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *