मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदेंकडे कारभार, हा कोणता राजधर्म आहे?

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२३ सप्टेंबर २०२२


राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमवीर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असताना आता राष्ट्रवादीच्या वतीने खासदार श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदे हेच राज्याच्या कारभार सांभाळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला आहे.खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर? अशी टीका वरपे यांनी ट्विट करत केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *