उपमहापौर पदाचा जल्लोष बोपखेलवाल्यांना भोवला चेतन घुलेंसह 70 जणांवर गुन्हा दाखल…

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी दि २६ मार्च २०२१
अखेर उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले यांचे चिरंजीव माजी शिक्षण मंडळ सभापती चेतन घुले यांच्या सह 50 ते 60 कार्यकर्त्यांवर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी करणे, जल्लोष करणे भोवला व गुन्हा दाखल झाला.

उपमहापौर पदाच्या च्या झालेल्या निवडणुकीत कोरोना चेंगरला की काय असेच चित्र २३ मार्च ला पालिकेत पाहायला मिळाले होते. सकाळपासूनच घुले यांच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात गर्दी केली होती. या गर्दीत महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले होते. व या महिला ही मिरवणुकीत नानी , नानी, नानी अशा घोषणा देत फुले उधळत होत्या. त्याचबरोबर तरुण वर्गही मोठ्या प्रमाणावर सफेद कुर्ते परिधान करून व 8 ते 9 महागड्या गाड्यांचा ताफा MH 12 - 1 अशा नंबर प्लेटसह मिरबणुकीत हजर होत्या. उपमहापौर नानी अशा गर्दीत ओपन गाडीत विनामास्क मिरवनुकीत हजर होत्या. उपमहापौरांच्या दालनात फुगे, व फुलांची सजावट केली होती. तिसऱ्या मजल्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती व सगळीकडे एकच चर्चा होती आता कोरोना गेला कुठे. शिस्तप्रिय समजले जाणारे चिंचवडचे आमदार यावेळी पक्षनेत्यांच्या दालनात हजर होते.
अखेर महानगरपालिकेच्या सुरक्षा विभाग व प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली. सुरक्षा विभाग पर्यवेक्षक दत्तात्रय बारकू भोर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली व त्यानुसार युवा नेते चेतन गोवर्धन घुले व त्यांच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांवर जमावबंदी व घोषणाबाजी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आयुक्त राजेश पाटील व प्रशासनाला उशिरा का होईना शहाणपण आले याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.