आळंदी परिसरात प्लॅस्टिक पिशवीत आढळले एक दिवसाचे अर्भक

खेड तालुक्यातील मरकळ मधील सुदर्शन वस्ती येथे प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेले एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळले. हे पुरुष जातीचे अर्भक भर पावसात प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन त्याचा परित्याग करण्यात आला आहे. सध्या बाळावर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून हा धक्कादायक प्रकार गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आला. मरकळ गावचे पोलीस पाटील विठ्ठल टाकळकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *