बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक
शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके व शिवसैनिकांच्या मध्यस्थीने अभिषेक इंटरनॅशनल स्कूल चा दिलासादायक निर्णय या वर्षीचे परीक्षा शुल्क व ट्युशन फी सोडून इतर सर्व शुल्क माफ
मोशी: दि ३० ऑक्टोबर, अभिषेक इंटरनॅशनल स्कूल मोशी याठिकाणी पालक व संस्थाचालक श्री सुरेश कसबे साहेब तसेच शिवसेनेचे पदाधिकारी श्री निलेश मुटके (उपजिल्हाप्रमुख), श्री सुरज लांडगे (युवा सेना जिल्हा युवा अधिकारी), विभाग प्रमुख श्री विश्वनाथ टेमगिरे यांमध्ये बैठक झाली.
अनेक दिवसांपासून पालक व संस्थाचालक यामध्ये विद्यार्थ्यांच्या फी संदर्भात सुरु असलेला संघर्ष आज शिवसेनेच्या मध्यस्थीने सामोपचाराने मिटला. जगात कोरोना ने थैमान घातले असताना अनेक पालकांना आपल्या विद्यार्थ्यांची फी भरताना अडचण येत होती अनेक पालकांना फी संदर्भात संभ्रम होता, शाळांना संस्था चालवताना खूप अडचणी येत होत्या परंतु अशा काळात विद्यार्थ्यांच्या तसेच पालकांच्या या मागणीला आज अभिषेक इंटरनॅशनल स्कूल यांचे संचालक श्री सुरेश कसबे साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शाळेच्या ट्युशन फी व परीक्षा शुल्क सोडून इतर अन्य शुल्क या शैक्षणिक वर्षासाठी माफ करण्याचा मोठा निर्णय घेऊन इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल असा निर्णय घेतला. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून फी संदर्भात आर्थिक अडचण जर काही पालकांची असेल तर संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहील.असेही ही संस्था चालकांनी सांगितले. अभिषेक इंटरनॅशनल स्कूल चे संस्थाचालक श्री सुरेश कसबे साहेब यांचे शिवसेना तसेच पालकांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले.
यावेळी पालक उद्योजक कदम हेही उपस्थित होते. एकीकडे काही शाळा पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावत असल्याचे व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण फी भरली नसेल तर ब्लॉक करून थांबवले जात असल्याचे दिसून चित्र नुकतेच एलप्रो स्कूल मध्ये दिसून आले पण या स्कूल ने घेतलेल्या या निर्णयावर पालक वर्गात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले. व सगळीकडे स्कूल ने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होताना दिसत आहे.