जैन साधू कामकुमार नंदीजी यांच्या हत्येच्या निषेधार्थ घोडेगाव येथे मोर्चा

घोडेगाव –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी जवळील हिरेकाडी येथे दिगंबर जैनाचार्य पू.आचार्य श्री कामकुमार नंदीजी गुरू महाराज यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ व मुनी सुरक्षेबाबत घोडेगाव ता.आंबेगाव येथे संपुर्ण बाजार पेठेतुन,पायी रॅली काढत या घटनेचा आंबेगाव तालुका जैन सकल संघाच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आला.जैन धर्मियांच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेगाव तालुका जैन सकल संघ वतीने जैन साधू मुनींच्या हत्तेच्या निषेधार्थ हातात झेंडे तसेच निषेधाचे फ्लेक्स घेवून मोर्चाद्वारे घोषणा देत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अहिंसात्मक आंदोलन करण्यात आले.


दोषींना कठोर शासन व्हावे, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशा मागणीचे निवेदन सकल आंबेगाव तालुका जैन धर्मियांच्या वतीने नायब तहसीलदार गवारी यांना देण्यात आले.
या प्रंसगी गिरीष राठोड, आशिष पुंगलिया, धिरज समदडिया,राजुशेठ भंडारी, दिपक लोढा,सुरेश गांधी, ललित बाबेल, निलेश शहा, अजित खिंवसरा, संतोष शेलोत, नवीन गुगळे, प्रदिप कोचर, रासिक शहा, किरण भंडारी,आशिष कटारिया, शंकर शहा,राजु खिवंसरा,राकेश मुथियान आदि सह स्थानिक जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *