मुलींनो कोणतीही समस्या असुद्या ११२ नंबर ला फोन करा -पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे

रामदास सांगळे
विभागीय संपादक
०९ मार्च २०२२

बेल्हे


विद्यार्थ्यांनींनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असुद्या घाबरू नका ११२ या नंबरवर फोन करा.आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन जुन्नर तालुका निर्भया पथकाचा प्रमुख व आळेफाटा पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे (शिंदे) यांनी बेल्हे येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, आयुष्यात आपल्याला कोणते क्षेत्र निवडायचे आहे,आपण कोण बनणार आहोत ही ध्येय धोरणे शालेय जीवनात ठरवा जोपर्यंत आपण ध्येय ठरवत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही. जेव्हा आपण ध्येय ठरवतो तेव्हा आपण ५० टक्के जिंकलेलो असतो.

महिला दिनाच्या दिवशी निर्भया पथकाने साधला विद्यार्थिनींशी संवाद

या वेळी निर्भया पथकाने शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारले त्याला समाधानकारक उत्तरे निर्भया पथकाने दिली. तसेच महिलादीना निमित्ताने महिला पालकांसाठी मॉडर्न स्कूलच्या वतीने पाकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या मध्ये गोडाचे पदार्थ बनवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक -मंगल भंडारी, द्वितीय – वर्षा माने,तृतीय – सविता खराडे यांना मिळाला तर तिखट पदार्थ बनवणे स्पर्धेत प्रथम क्रमांक- नेहा गांधी, द्वितीय- श्वेता भंडारी,तृतीय- पूजा गुगळे व श्रद्धा माने यांनी पटकवला.


यावेळी निर्भया पथकाच्या जुन्नर तालुका प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे (शिंदे), पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, प्रमिला भालेकर, ज्योती दहिफळे, प्रतीक जोरी, शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे, विश्वस्त दावला कणसे, उपप्राचार्य के.पी. सिंग,आपला आवाज न्यूज चँनल चे जुन्नर तालुका विभागीय संपादक रामदास सांगळे, शिक्षक, विद्यार्थी पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *