विद्यार्थी हे उद्याचे भविष्य त्यांच्या या असंतोषाला राज्य सरकार जबाबदार : अमित गोरखे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

दि १२ मार्च २०२१
राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पुढे ढकलल्यामुळे विधान परिषेदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात आंदोलन सुरु केले. त्यांना अटक ही झाली. त्याचा निषेध करतो.

पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, नाशिक,अहमदनगर येथे विध्यार्थ्यांच जोरदार आंदोलन चालू आहे. MPSC चे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे शहरातील नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे.

याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे हे मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिनांक १४ मार्च रोजी होणार होती. या परीक्षेला केवळ तीन दिवस उरलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुले प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे. एमपीएससी परीक्षेसाठी वर्षानुवर्षे तयारी करणारे लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनी या निर्णयामुळे संतप्त झाले आहेत. पुणे, संभाजीनगर तसंच राज्यात ठिकठिकाणी ते रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार?,” असं पाषाणकर यांनी म्हटलंय.

तर, बिचारे विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. परीक्षा पुढे ढकलणे बरोबर नाही. सगळेच विद्यार्थी एकाच प्रयत्नात परीक्षा पास होतात असे नाही. अनेक विद्यार्थ्यांचा दुसरा आणि तिसरा प्रयत्न असतो. ते एज बार होऊ शकतात. १४ तारखेच्या परीक्षा घ्यायलाच पाहिजेत. परीक्षा २ दिवसांवर असताना सरकार अचानक असे निर्णय घेऊ शकत नाही, अस देखील गोरखे म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *