घोडेगाव – बी.डी.काळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश

येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश मिळविले आहे.
या पोलीस भरतीमध्ये अल्पेश अनिल बोराडे (नवी मुंबई पोलीस),सुदाम भांगे,आदेश शेळके,सागर पारधी आणि दिव्या शेगर (पुणे ग्रामीण पोलीस),आशिष वाघमारे, अर्चना राक्षे,अविनाश गवारी (मुंबई पोलीस) इ.विविध ठिकाणी पोलीसपदी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांनी अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण घेऊन अभ्यास, परिश्रम,शारीरिक कष्ट इ.च्या द्वारे हे यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम नामदेवराव काळे, उपाध्यक्ष शामशेठ होनराव,सचिव अक्षयशेठ काळे,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॕड. मुकुंदराव काळे,कार्याध्यक्ष राजेश काळे,न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल कमिटीचे चेअरमन बाळासाहेब काशिनाथ काळे,तसेच प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर, उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गव्हाळे,शा.शि.संचालक प्रा.भाऊसाहेब थोरात,गणेश शिंदे इ.नी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *