श्री कुलस्वामी खंडेरायाची चैत्र पौर्णिमा यात्रा यंदा भव्य दिव्य – अध्यक्ष बाळासाहेब गगे

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१४ एप्रिल २०२२

नळवणे


चैत्र पौर्णिमे निमित्त श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान नळवणे (ता.जुन्नर) येथील दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला यात्रा उत्सव यंदा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे.अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी दिली.

शनिवार दि.१६ रोजी पहाटे ४ ते ५ श्रीस मंगल स्नान व अभिषेक श्रीं च्या चांदीच्या पादुकांची प्रतिष्ठापना,सकाळी ५ ते ७ हनुमान जन्मोत्सव, त्यानंतर ९ ते ११ श्रीची भव्य मिरवणूक, मांडव डहाळे देवदर्शन व खोबरे भंडाऱ्यांची उधळण होणार आहे. तसेच सायंकाळी ७ रात्री ११ श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम होईल. रात्री ११ नंतर वारसा माझ्या महाराष्ट्राचा हा महाराष्ट्रीयन लोकनृत्याचा कार्यक्रम होईल. तर रविवार दि.१७ रोजी दुपारी साडेतीन ते सहा या वेळेत जंगी कुस्त्यांचा आखाडा होणार आहे.

देवस्थानने यात्रेनिमित्त श्री च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पाणी, पार्किंग व्यवस्था, उन्हापासून संरक्षण व दर्शनबारी इत्यादी सोयी सुविधा चे नियोजन केले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा बंद होती.यंदा दोन वर्षांच्या नंतर यात्रा भरत असल्याने सर्व भाविकांमध्ये ,ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.यात्रे निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान आणि ग्रामस्थांनी केले आहे.तरी सर्व भाविकांनी श्री च्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे व ग्रामस्थांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *