अखेर दिल्ली मधून शरद पवार यांनी भाकरी फिरवली…

कार्यकारी अध्यक्ष पदी सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल यांची निवड…

दिल्ली
दि.10/06/2023

आज 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस च्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्ली मध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल यांच्या कडे कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

पक्षात भाकरी फिरवावी लागेल असे विधान शरद पवार यांनी काही दिवसांआधी केले होते.त्या नंतर स्वता शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.या नंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी केलेल्या अंदोलना नंतर शरद पवार यानी आपला निर्णय मागे घेतला होता.परंतु आज 10 जून पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड करून सुप्रिया सुळे यांच्याकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रासह इतर राज्यांची जबाबदारी दिली आहे…सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल
यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्या नंतर अजित पवार हे नाराज असल्याचे बोले जात असले तरी अजित पवार यांनी नवीन कार्यकारी अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *