पुष्पावती विद्यालयात लसीकरण मोहीमेला सुरुवात

दिपक मंडलिक
बातमी प्रतिनिधी
०८ जानेवारी २०२२

ओतूर


ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित पुष्पावती विद्यालय डिंगोरे तालुका जुन्नर येथे इयत्ता नववी आणि दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 15 ते 18 या वयोगटातील विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सिन चा पहिला डोस देऊन लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अस्वार यांनी दिली. जिल्हा परिषद पुणे च्या आरोग्य विभागामार्फत ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सारोक्ते आणि डॉ.शेखरे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या एकूण 120 विद्यार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला.

या लसीकरण मोहीमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे सदस्य अंकुशराव आमले यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डिंगोरे गावच्या सरपंच सिमाताई सोनवणे माजी जि.प. सदस्य बबनराव तांबे उपसरपंच निलेशभाऊ लोहोटे मुक्तादेवी मंडळ मुंबई चे वसंतराव लोहोटे लक्ष्मणदादा लोहोटे स्थानिक स्कूल कमिटी चे अध्यक्ष चंद्रकांत लोहोटे सर शिक्षक पालक संघाचे वैभव पाडेकर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालकवर्ग उपस्थित होते. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक शेलारसर आरोग्य सहाय्यिका रोकडे सिस्टर आशा वर्कर्स बनकर ताई मंडलिक ताई पावडे ताई तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *