राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या दिग्गज नेत्याने केला मावळ लोकसभा मतदार संघावर दावा

 

शिरूर लोकसभा मतदार संघातून माजी आमदार विलास लांडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली असल्याची बातमी ताजी असतानाच. आत्ता आणखी एका स्थानिक नेत्याने चक्क मावळ मधून उमेदवारी साठी इकचुक असल्याच उघडपणे सांगितलंय. त्या मुळे आत्ता अजित पवार सह पार्थ पवार यांची डोके दुखी वाढण्याची शक्यता आहे.
भोसरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी आतापासूनच शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. तसेच अस देखील म्हटलं जातंय कि अमोल कोल्हे पुढील नवडणूक नाही लढवणार.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महापौर संजोग वाघिरे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत उघडपणे आपण मावळ लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असे सांगितले “पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव असल्या कारणाने मला तिथून उभे राहता येत नाही त्यामुळे मी मावळ लोकसभेसाठी खासदारकी करिता इच्छुक आहे,मी 2019 वेळी देखील इच्छुक होतो तसेच यंदा देखील इच्छुक आहे असे वाघिरे यावेळी म्हणाले”
ह्या वक्तव्य मुळे अजित पवारांच टेन्शन वाढणार का इच्छुकांना उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *