हिंजवडीत तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग कोसळण्याच्या घटना !

मंगळवार (दिनांक 30 मे) दुपारी साडेतीन च्या सुमारास हिंजवडी येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावर दोन ठिकाणी तर आयटी पार्क फेज वन मधील पद्मभूषण चौकाजवळ एक ठिकाणी होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.मारुंजी रस्त्यावर झालेल्या घटनेत वाहनांचे नुकसान झाले तर फेज वन येथील घटनेत दुचाकी वर जाणारे आणि इतर दोघे असे चार जण जखमी झाले आहेत.दरम्यान मंगळवारी दुपारी हिंजवडी सह परिसरात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे हे होर्डिंग कोसळण्याची घटना घडली आहे. किवळे  होर्डिंग दुर्घटनेला महिना होऊन गेला आहे तरीही हिंजवडीत मात्र धोकादायक होर्डिंग वर प्रत्यक्ष कारवाई होताना दिसत नाही  एकूण हिंजवडीची संख्या,अहवाल,स्ट्रक्चरल ऑडिट,अशा तांत्रिक बाबतीत ग्रामपंचायत अडकल्याची गावात उलट सुलट चर्चा आहे. यापूर्वीही होर्डिंग दुर्घटनेच्या अनेक घटना हिंजवडी परिसरात घडले आहेत.  या पडलेल्या होल्डिंगमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.हिंजवडी येथील मान रस्ता आणि हिंजवडी फेस वन या रस्त्यावर हे अनधिकृत होर्डिंग कोसळले आहेत.तसेच जखमी नागरिकांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याचबरोबर किवळे  दुर्घटनेला एक एक महिना ही उलटून गेला नाही आणि हिंजवडी ही होर्डिंग कोसळण्याची घटना घडली आहे. ह्या होर्डिंग पडण्याच्या  घटना वारंवार होत असल्याने पालिका प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *