भाजप-शिंदे गटातील खुस-भूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर

गेल्या १० महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेना (शिंदे) भाजप  सरकार सत्तेवर आले. शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद भूषविले . आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना राज्यातील आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचं  म्हटलं जातंय.यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व काही आलबेल अस जरी दिसत असल तरी, भाजपने शिंदे यांच्या समर्थक १३ खासदारांच्या मतदारसंघांत देखील आपली तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील भाजपने संयोजक नेमल्याच. समजत आहे. आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजपने संयोजक नेमल्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. तसेच अधून मधून शिंदे गटाची नाराजी देखील उघड पणे दिसून येते. भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघात देवयानी फरांदे तर शिर्डीत विखे पाटील यांना संयोजक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शिंदे गटावर हे भाजप दबावतंत्र आणतय का ? अशी चर्चा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील? याबाबत निर्णय झालेला नाही. यामुळे मतदारसंघ कोणाकडे आहे, याचा विचार न करता तयारी करा. जागावाटपात पुढे काय होईल, ते नंतर ठरणार आहे. परंतु आपल्या मतदारसंघात शिंदे गटाचा खासदार आहे, म्हणून काही करण्याची गरज नाही, असे अजिबात समजू नका, असे निर्देश भाजपकडून आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे . शिंदे गटाकडे भाजप इतकी संघटनात्मक रचना नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागणार आहे. म्हणूनच भाजपने शिंदे गटाच्या १३ खासदारांच्या मतदारसंघात देखील संयोजक नेमले असल्याची चर्चा सुरू आहे. जर असा झालच तर भाजप, शिंदे यांचा फक्त वापर करून घेतंय का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *