संगीता तरडे उद्धव श्री पुरस्कार 2022 ने सन्मानित

पिंपरी-चिंचवड
३१ ऑगस्ट २०२२


गेल्या 22 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना यांच्या वतीने दिला जात असलेला उद्धव श्री पुरस्कार 2022 ह्या वर्षी आपला आवाज आपली सखी च्या संचालिका तथा महा मेट्रो PCMC च्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर संगीता तरडे यांच्या सह इतर मान्यवरांना विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांच्या हस्ते मंगळवार दि.30 ऑगस्ट रोजी रामकृष्ण मोरे सभागृहात असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित

पुणे जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.बाबा धुमाळ यांनी सन 2000 साली उद्धव श्री या पुरस्काराची सुरूवात केली. स्व.बाबा धुमाळ यांच्या निधनानंतर या पुरस्काराची प्रथा पुढे सचिव संयोजक गुलाबराव गरूड मा.उपशहरप्रमुख तसेच मा.आमदार गौतम चाबुकस्वार कामगार नेते इरफान सय्यद व त्यांच्या सहकार्यानी सुरूठेवत अनेक दिग्गजांना उद्धव श्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. ह्या वर्षी दिल्या गेलेल्या उद्धव श्री पुरस्काराचे हे 22 वे वर्ष होते.

उद्धव श्री पुरस्कार 2022 ची पुरस्कार वितरणाची सुरूवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे आमदार तथा पिंपरी-चिंचवड संपर्क प्रमुख सचिन आहेर प्रदेश संघटक गोविंद घोळवे पिंपरी-चिंचवड शिवसेना संपर्कप्रमुख वैभव थोरात मा.आमदार गौतम चाबुकस्वार कामगार नेते इरफान सय्यद संयोजक गुलाबराव गरूड शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले सुलभा उबाळे अॅड.उर्मिला काळभोर युवा पुणे जिल्हाप्रमुख अनिकेत घुले यांच्या हस्ते करून करण्यात आले.

उद्धव श्री पुरस्कार 2022 ने सत्कारमूर्ती पद्मश्री मुरलीकांत पेटकर तसेच आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे,श्रीकांत बडवे,डॉ. स्मिता जाधव, अक्षय बाहेती,आर. आर. थोपटे,मुबारक खान, श्रीमती प्रभा शिवनेकर, विजय यादव,रामदास कुदळे,धनंजय डोंजेकर, रमेश पाचंगे, संतोष साळुंखे,मिलिंद कांबळे, मेहबूब शेख,बाबू नऱ्हे,आकांक्षा पिंगळे यांना सन्मानित करण्यात आले.
उद्धव श्री पुरस्कार 2022 ने सत्कारमूर्ती पद्मश्री मुरलीकांत पेटकर तसेच आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे, श्रीकांत बडवे, डॉ. स्मिता जाधव, अक्षय बाहेती,आर. आर. थोपटे, मुबारक खान, श्रीमती प्रभा शिवनेकर, विजय यादव, रामदास कुदळे, धनंजय डोंजेकर, रमेश पाचंगे, संतोष साळुंखे, मिलिंद कांबळे, मेहबूब शेख, बाबू नऱ्हे, आकांक्षा पिंगळे यांना सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी,माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते,माजी मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई,शशिकांत सुतार आदींसह प्रमुख मान्यवरानी उपस्थिती लावली आहे.तसेच उद्योगपती व माजी खासदार राहुल कुमार बजाज, उद्योजक बाबा कल्याणी तसेच भय्यू महाराज,खडीवाले वैद्य,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, युवा कलाकार भूषण कडू यांनाही उद्धव श्री पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *