पुणे मेट्रोचे नाव वापरून तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक

१९ डिसेंबर २०२२

पुणे


पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगुन गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांना तब्बल १ कोटी २१ लाखांची फसवणूक केली आहे. पंकज गुल जगासिया यांनी यासंबंधी तक्रार दिली आहे. फसवणुकी प्रकरणी ईश्वर चंदुलाल परमार व सनत ईश्वर परमार यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर परमार व सनत परमार यांनी कामगार पुतळा परिरसातील स्वतःच्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार होता. मात्र, संबंधित जागेवर विकसनाचे अधिकार त्यांना नव्हते. तरीही दोघांनी फसवणुक करण्याच्या उद्देशाने संबंधित जागेवर प्रोजेक्ट होणार असल्याचे खोटे कारण पंकज जगासिया यांना सांगितले. गुंतवणुक केल्यास जादा रक्कम मिळेल असे अमिष दाखवले आणि फसवणूक केली आहे.आरोपींनी संबंधित प्रोजेक्टमध्ये लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडुन 1 कोटी 21 लाख रुपये घेतले. मात्र 2016 पासून आतापर्यंत त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात आलेले नाही. यासंबधी पोलिस अधिक तपास करत आहेत. पुण्यातून वारंवार अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *