महाराष्ट्र शासनाच्या आदर्श अंगणवाडी योजनेत जुन्नर तालुक्यातील २९ अंगणवाडयांची निवड

जुन्नर (वार्ताहर):-

राज्य शासणाने राबविलेल्या आदर्श अंगणवाडी योजनेमधुन जुन्नर तालुक्यातील २९ अंगणवाड्यांची आदर्श अंगणवाडी बनवण्यासाठी निवड झाली आहे अशी माहीती जिल्हा परीषद सदस्य पांडुरंग पवार यांनी दिली.


महाराष्ट्र शासणाने राबविलेल्या आदर्श अंगणवाडी योजनेमध्ये राज्यातुन १२८० अंगणवाडयांची निवड झाली असुन यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील २९ अंगणवाड्यांची निवड झाली आहे.तालुक्यातील दोन विभाग असुन जुन्नर विभागात ३६३ अंगणवाडया आहेत. यामधुन १७ अंगणवाडी तर नारायणगाव विभागात १६२ अंगणवाडी आहेत यामधुन १२ अंगणवाडयांची दोन्ही मिळुन २९ अंगणवाड्यांची निवड झालेली आहे.
याबाबतची जिल्हा परीषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी माहीती देताना सांगीतले की एका अंगणवाडी साठी १ लक्ष ६५ हजार रुपयांचा निधी मिळणार असुन यामध्ये सौर उर्जा संच बसवणे,शैक्षणिक मदत केंद्र बनविणे,इ.लर्निंग साहीत्य पुरविणे,मुंलासाठी टेबल खुर्च्या पुरविणे, स्थानिक साहीत्यांवर आधारीत शैक्षणिक साहीत्य निर्माण करणे,मुलांना स्वच्छ भारत किट पुरविणे, पिण्याचे पाण्याची कुलर,इलेक्ट्रॉनिक वजन काटा पुरविणे,विज लाईट पुरविणे आदी साहीत्यांवर हा खर्च करण्यात येणार असुन पुणे जिल्ह्यातुन जुन्नर तालुक्यातीलच २९ अंगणवाडयांची निवड झालेली असुन तालुक्यातील आणखी अंगणवाडयांची निवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *